डोळे तुझे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका..! असं आणि बरंच काही आपले डोळे नेहमीच सांगत असतात. आपल्या भावना अनेकदा न बोलताही डोळ्यांमार्फत प्रकट होतात. पण डोळे हेल्दी असतील तरच हे शक्य असते. अन्यथा डोळ्याखाली काळा रंग आलेले, मोठ्या भिंगाचा चष्मा लावलेले चेहरे आपण आपल्याभोवती रोजच पाहतो. अनेक आजारांची पूर्व लक्षणे डोळे दाखवत असतात. त्यामुळे डोळ्यांची सर्वार्थाने काळजी घेणे आवश्यकच आहे.

२१ जून, जागतिक योग दिवस... या दिवसाचे महत्त्व जाणून सर्वांनी रोजच योग करायाला हवा. पण हा योग केवळ बाह्य अवयवांपुरताच मर्यादित नाहीये. आपले डोळे हा शरीराच्या खुपक नाजूक आणि संवेदनशील अवयव आहे. आपण त्याकडे योग करण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला याची माहितीच नसते. डोळ्यांचाही व्यायाम-योग समजून घेतल्यास आपली दृष्टी सुदृढ राहण्यास नक्कीच मदत होते.

त्राटक किंवा एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करणे

जवळच्या किंवा लांबच्या एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रित करण्याचा व्यायाम केल्यास डोळयांचे कार्य योग्यरीतीने चालण्यासाठी नक्कीच मदत होते. यालाच त्राटक असे म्हणतात. याचेही काही प्रकार आहेत, ते आपण बघूयात...

नासिकाग्र त्राटक (नाकाकडे एकाग्रतेने पाहणे)

आपल्याला योग्य वाटणाऱ्या कोणत्याही अवस्थेत बसून नाकाच्या शेंड्याकडे सलग दोन ते तीन मिनिटे पाहावे, त्यानंतर काही मिनिटे डोळे मिटून शांत बसा. यासाठी ताठ बसणे गरजेचे असून मानही ताठ असायला हवी. असे काही वेळ सतत करायला हवे.

भ्रूमध्य त्राटक (भुवयांमध्ये एकाग्रतेने पाहणे)

शरीर आणि मान ताठ ठेवून आरामात बसा आणि आपली नजर भुवयांच्या मधल्या जागेवर केंद्रित करा. असे एक किंवा दोन मिनिटांसाठी कारावे. त्यानंतर डोळे मिटून शांत बसावे.

दक्षिणजात्रू त्राटक (उजव्या खांद्यावर नजर एकाग्र करणे)

यात आपली नजरा आपल्या उजव्या खांद्यावर एकाग्र करायची असते. पण यासाठी ताठ बसून, मान सरळ आणि डोके स्थिर ठेवणे आवश्यक असते. याचा सराव करताना शरीरही अगदी सरळ ठेवायाला हवे. अशी स्थिती एक-दोन मिनिटांसाठी ठेवून नंतर डोळे मिटून त्यांना आराम द्यावा.

वर्णजात्रू त्राटक (डाव्या खांद्यावर नजर एकाग्र करणे)

यात आपली नजरा आपल्या डाव्या खांद्यावर एकाग्र करायची असते. पण यासाठी ताठ बसून, मान सरळ आणि डोके स्थिर ठेवणे आवश्यक असते. याचा सराव करताना शरीरही अगदी सरळ ठेवायाला हवे. अशी स्थिती एक-दोन मिनिटांसाठी ठेवून नंतर डोळे मिटून त्यांना आराम द्यावा.

डोळयांचे मर्दन

मर्दन करणे म्हणजे मसाज करणे. डोळ्यांवर अगदी हलक्या हाताने दाब देऊन डोळ्यांभोवती बोटांनी मसाज करावा. त्यामुळे डोळ्यांचा रक्तप्रवाह सुधारतो आणि दृष्टीत सुधार होतो.

डोळे धुणे

डोळ्यांची कार्य आणखी सुधारण्यासाठी त्यांना शुद्ध आणि थंड पाण्यानी धुणे आवश्यक असते. डोळ्यात कोरडे पडले तर ते चुरचुरतात हा अनुभव सगळ्यांनीच घेतला असेल. त्यासाठी व्यायामा नंतर किंवा सततच्या त्रासदायक कामानंतर त्यांना थंड पाण्याने धुवायला हवेत. यामुळे डोळ्यांवर अगदी सकारात्मक परिणाम होतात.

सूर्याकडे एकटक पाहणे

सूर्यप्रकाश हा डोळयांना हानीकारक नसतो, तर उलट तो सर्वात आरोग्यकारक असतो. सूर्याकडे एकटक पाहण्याचा सर्वात चांगला काळ हा सकाळी लवकर (७ ते ८ वाजेपर्यंत) किंवा संध्याकाळी उशिरा (५ ते ६ वाजेपर्यंत) असतो. थोडक्यात, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ ही चांगली मानली जाते. दृष्टी कमजोर असणा-यांनी वेदना किंवा त्रास होत नाही तोपर्यंतच सूर्याकडे पाहावे. कडक उन्हांत सूर्याकडे पाहणे खूप हानिकारक ठरणारे असते, याची काळजी घ्यावी. सरावाने सूर्याकडे एकटक पाहण्याची कला येऊ शकते

डोळ्यांचे हे व्यायाम प्रकार वेगवेगळ्या वेळी किंवा एकत्रीतही करता येऊ शकतात. डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास याने नक्कीच मदत होते. चला तर मग, आजच्या या योग दिवसानिमित्त डोळ्यांच्या व्यायामाचाही आपण निर्धार करू...!

  BOOK NOW CALL NOW  CHAT